उध्दार-1

“तुला पुन्हा एकदा सांगतो, जाऊ नकोस…”

प्रदीप आपल्या लहान भावाला जीव तोडून सांगत होता..

“दादा मलाही तुम्हाला सोडून जाण्यात धन्यता वाटत नाहीये, पण भविष्याच्या दृष्टीने मी जाणं रास्त आहे.”

“कसलं भविष्य? तू गेलास तर तुझ्यापासून सगळे नातेवाईक, मित्रमंडळी सुटतील…अरे आपण आजवर त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झालोय…तू गेलास तर तिकडचाच होऊन जाशील..”

“दादा दूर गेल्याने नाती तुटत नाहीत..”

“ठीक आहे, तू ऐकणारच नाहीस म्हटल्यावर मी तरी काय बोलणार..”

लहान भाऊ माधव घराबाहेर पडला. प्रदीप- माधवचा मोठा भाऊ. लहानपणापासून अभ्यासात हुशार, प्रामाणिक आणि सर्वांची मदत करणारा. प्रदीप सुद्धा मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन त्याचेच अनुकरण करायचा. पण प्रदीपला याहीपलकडे एक वेगळं जग आवडायचं, नवनवीन गोष्टी करायला आवडायच्या. तंत्रज्ञान आवडायचं. पण ते या गावात राहून शक्य नाही हे त्याने ओळखलं होतं, त्यासाठी गावाची सीमारेषा ओलांडावीच लागेल हे त्याने हेरलं होतं.

प्रदीपही हुशार होता. शिक्षण झाल्यानंतर त्याला अनेक नोकरीच्या ऑफर आल्या, पण गाव सुटेल या भीतीने त्याने शेतीच बघायची ठरवली आणि गावातच एक इलेक्ट्रिकचं दुकान थाटलं.
*****

Leave a Comment