“बाबा ही साडी कशी वाटते? आत्यासाठी करू का ऑर्डर?”
रक्षाबंधनसाठी आत्या येणार असल्याने तिला काय गिफ्ट द्यायचं याची चर्चा डायनिंग टेबलवर बाप लेकात सुरू होती,
मुलगा कमवता झाल्याने आता घरात भरभरून वस्तू येत होत्या,
त्याची आई सिंकमध्ये भांडी जमा करत होती आणि काम करता करता सगळं ऐकत होती,
“तुझ्या आतेभावासाठीही कर काहीतरी ऑर्डर..खूप दिवसांनी येतोय तो..”
घरात छान वातावरण होतं, येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती, मुलगा नाष्टा करता करता ऑनलाईन साडी बघत होता आत्यासाठी, त्याला एक आवडली आणि तो म्हणाला,
“बाबा ही बघा, कशी आहे?”
“छान दिसतेय, आईला दाखव एकदा..”
“बघू बरं..” आई हात पुसत मोबाईलमध्ये बघू लागली,
बाबांनी विचारलं, “कितीची आहे?”
“2500 ची..”
“घेऊन टाक..फार महाग नाहीये..”
बस, एवढं म्हटलं आणि आईचा सूर बिघडला..
“2500? काय हो, मागच्या दिवाळीला मी 1500 ची एक साडी काढली तर मला म्हणे महाग आहे, आता 2500 ची सहज घेताय? फार महाग नाहीये म्हणताय?”
बस्स.. खडा पडायचा उशीर की आईचं तोंड सुरू व्हायचं..
गेल्या काही वर्षांपासून हेच सुरू होतं,
जरा एखादा विषय निघाला की आई सगळं मागचं आठवायची, त्यावरून आदळआपट करायची, संताप करायची..
मग दोन दिवस अबोला,
मानसिक स्वास्थ्य नसायचं..
वडील खरं तर या वागण्याला कंटाळले होते,
*****