उद्धार-3 अंतिम

घरी गेल्यावर प्रदीप च्या चेहऱ्यावर असलेली निराशा माधवने बरोबर हेरली..

“दादा, तुला वाईट वाटलं ना??”

प्रदीप मौन राहिला..

“दादा मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण ऐक… तू प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी सगळीकडे असतोस, सगळीकडे फिरतोस, त्यामुळे लोकं तुला गृहीत धरतात…असं माणूस दुरावण्याची भीती त्यांना कधीच नसते, ते म्हणतात ना..अतिपरीचयात अवज्ञा… तेच झालंय… मी गावी नसतो, कुणाच्या संपर्कात नसतो, पण तिकडे असूनही मी इथल्या बऱ्याच मुलांना माझ्या कामाबद्दल, नवीन कोर्सबद्दल माहिती दिली, इथल्या बऱ्याच मुलांना मी तिकडे काम दिलं..त्यामुळे कदाचित त्यांनी मला हा मान दिला असावा…

प्रदीपला भावाचा अभिमान वाटला,

प्रदीपला शाबासकी देऊन तो खोलीत येऊन पहुडला आणि आत्मचिंतन करू लागला…

त्याने या प्रसंगातून निष्कर्ष काढला…

“आधी स्वतःचा उद्धार करायचा आणि मग समाजाचा… स्वतःचा उद्धार केला की इतरांनाही त्या उंचीवर नेता येते…पण त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकवेळी आपण हजर असावच असं नाही…स्वतःची प्रगती साधल्यानंतर इतरांच्या भल्याचा विचार केला तरच आयुष्य मार्गी लागते…नाहीतर आपल्यासारखं होऊन बसतं…”

समाप्त

Leave a Comment