महिला दिनानिमित्त भेट आयडिया
8 मार्च म्हणजे स्त्रियांचा हक्काचा दिवस! जागतिक महिला दिन! रोजच्या आयुष्यात भरपूर मेहनत घेणाऱ्या आणि कसलीही अपेक्षा न ठेवता सतत कार्यरत राहणाऱ्या स्त्रियांच्या कार्याची ज्या दिवशी आठवण काढली जाते तो म्हणजे हा दिवस.
एरवी कामात स्वतःला झोकून देणाऱ्या स्त्रिया यादिवशी मात्र हक्काने छान छान तयार होऊन, एकत्र येऊन स्वतःसाठी वेळ देतात. वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जातात किंवा काही महिलांचा ग्रुप एकत्र येऊन एक हलका फुलका छोटासा का होईना एखादा कार्यक्रम ठरवून नक्कीच हा दिवस छान घालवतात.
याच निमित्ताने ANS Crafts काही भेट आयडिया घेऊन आले आहे. तुम्ही जर छोटेखानी किंवा अगदी मोठा कार्यक्रम आखण्याच्या बेतात असाल आणि या खास दिवशी आपल्या सख्यांना काय भेट द्यायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. किंबहुना जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास स्त्रीसाठी म्हणजेच तुमच्या लाडक्या परीसाठी, तुमच्या राणीसाठी किंवा तुमच्या सगळ्यात लाडक्या आईसाठी काही भेट घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला या लेखाची मदत होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता येणाऱ्या महिला दिनानिमित्त घरच्या लक्ष्मीला, सख्यांना खुश करण्यासाठी काय देता येईल हे पाहूया! तुम्हाला यातील कोणतीही वस्तू खरेदी करायची असल्यास 9561588598 या ANS Crafts च्या नंबरवर नक्की संपर्क साधा. Bulk order देखील स्वीकारल्या जातील.
१. Tote bag:- ही बॅग कॉटन कापडापासून बनवली आहे. आत मध्ये अस्तर आणि cushioning असल्याने टिकाऊ आणि washable आहे. Size बऱ्यापैकी मोठी असल्याने बरेच सामान यात बसते. या पर्सला तीन कप्पे आहेत. तुमच्या आवडीच्या कापडात शिवून मिळेल.
२. Mini Handbag:- ही पर्स सहज फिरायला जाताना किंवा देवळात जाताना घेऊन जाण्यासाठी उपयुक्त आहे. लहानसहान सामान आणि छोटी पाण्याची बाटली यात सहज बसते. या छोट्या पर्सला दोन कप्पे आहेत. शिवाय यातही अस्तर आणि cushioning असल्याने टिकाऊ आहे. तुमच्या आवडीच्या कापडात शिवून मिळेल.
३. Sling bag :- सध्या sling bag ची फॅशन आहेच. या बॅग खणाच्या कापडापासून बनवल्या आहेत. अस्तर आणि cushioning यामुळे टिकाऊ आहेत. तुमच्या आवडत्या रंगात शिवून मिळतील.
४. प्रत्येक स्त्रीला आवडतो तो गजरा! पण नेमक्या कार्यक्रमाच्या दिवशी एकतर तो आणायचा राहतो किंवा सुकून जातो म्हणूनच हा artificial फुलाचा गजरा छान पर्याय आहे. सोला वूड या मटेरियल पासून बनवलेले हे गजरे टिकाऊ आणि दिसायला अगदी खरे आहेत.
५. Quilling earrings:- वजनाला अगदी हलके आणि दिसायला अगदी सुरेख ही कानातली कोणालाही खूप आवडतील. तुमच्या आवडीच्या रंगात आणि हव्या त्या डिझाईन मध्ये करून मिळतील.