निचरा-3

त्याने तिला फोन लावला, तिचा फोन बंद येत होता..

त्याने आईला विचारलं,

“मला काय माहित? बॅग उचलून गेली कुठेतरी..”

“बॅग उचलून? अगं तू तिला थांबवलं का नाहीस?”

“मी कशाला थांबवू? माझ्या लेकीला फाडफाड बोलून बसली ती..”

आता मात्र त्याचं अंग घामेघूम झालं,

खोलीत त्याला एक चिठ्ठी सापडली,

“प्रिय म्हणण्याइतक्या नवऱ्याची कर्तव्य तू पार पाडली नाहीस म्हणून म्हणत नाही, मी कायमची घर सोडून जातेय…मला शोधू नकोस. आणि कारण मी तुला सांगणार नाही, कारण तुला त्याची कटकट वाटते…आता मी घर सोडून गेलीये ही गोष्ट ‘क्षुल्लक’ समज आणि तुझं सुरू राहू दे..गुडबाय..”

आता मात्र तो पुरता कोसळला,

आईला विचारावं तर आई तिचीच बाजू सांगे, पण आई जे सांगत होती तशी ती नव्हती हे त्यालाही ठाऊक होतं,

पण आता वेळ निघून गेली होती,

या मागच्या काही महिन्यात काय घडलं होतं? काहीतरी भयंकर घडलं होतं का? ते जाणून घेण्याचा मार्ग त्याने स्वतःहून बंद केलेला…पुन्हा कटकट नको असं सांगून तिच्या वेदनांचा त्याने कधी निचरा होऊच दिला नाही…त्याला outlet दिलंच नाही…

त्याने पहिल्या वेळेपासूनच जर तिची तक्रार ऐकली असती,

वेळीच त्याकडे गांभीर्याने पाहिलं असतं,

आणि वेळीच तोडगा काढला असता तर आज ही वेळ आलीच नसती…

तात्पर्य
कौटुंबिक कलहात जेव्हा वाद टोकाला जातात, तर बऱ्याचदा त्याला घरातले पुरुष कारणीभूत असतात. त्यांच्यासाठी हे वाद क्षुल्लक असतात, पण स्त्री साठी ते मनावर खोलवर जखम करणारे असतात..पुरुषांनी जर वेळीच घरातल्या स्त्री साठी खंबीरपणे उभं राहिलं तर परिस्थिती खूप सकारात्मक असेल..जरूर विचार करा…

3 thoughts on “निचरा-3”

  1. It was great seeing how much work you put into it. The picture is nice, and your writing style is stylish, but you seem to be worrying that you should be presenting the next article. I’ll almost certainly be back to read more of your work if you take care of this hike.

    Reply
  2. My brother suggested I might like this blog He was totally right This post actually made my day You can not imagine simply how much time I had spent for this info Thanks

    Reply

Leave a Comment