जेव्हा त्या उमगतात-1

सुनबाई कसं वाटतंय आता?”

सासूबाई सूनबाईच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने विचारत होत्या,

तापाने फणफणलेल्या तिला या प्रेमळ शब्दांनी बरं वाटलं,

दुसऱ्या दिवशी तिला बरं वाटायला लागलेलं पण अशक्तपणा अजूनही होता,

तेवढ्यात सासूबाईंनी आवाज दिला,

“लोळत पडणार का आता दिवसभर? चला कामाला या..”

तिला हे नवीन नव्हतं,

सासूबाईंचा स्वभाव तिच्या आकलनाच्या पलीकडे होता,

कधी कधी अश्या वागत की त्यांची सख्खी मुलगी आहे,

आणि कधी कधी टोकाचा जाच करत,

त्यांच्या मनात काय आहे हे ओळखणं खरंच कठीण होतं तिला,

घरात सासू, सून आणि तिचा नवरा,

हे तिघेच,

एकुलता एक मुलगा,

वडील लहानपणीच गेलेले,

आईने एकटीने मुलाला मोठं केलं,

सक्षम बनवलं,

सुनबाई याच विचाराने त्यांच्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करे,

एकदा घरी अचानक पाहुणे आलेले,

सुनबाई त्यांची विचारपूस करत होती,

सासूबाई आल्या आणि ओरडल्या,

“नुसत्या गप्पाच मारणार की चहा पाणी पण करणार?”

त्यांनी सर्वांसमोर असा अपमान केला म्हणून खरं तर तिला रागच आलेला,

पण तिचे संस्कार तिला मौन बाळगायला भाग पाडत होते,

सासूबाई पाहुण्यांसोबत बसल्या आणि बोलू लागल्या,

“काय कसं चाललंय?”

त्यांच्या गप्पा तिच्या कानावर पडत होत्या,

मधूनच एक वाक्य ऐकू आलं,

“आमच्या सुनबाई सारखी मुलगी शोधून सापडणार नाही..”

आत्ता थोड्यावेळापूर्वी अपमान केलेल्या त्या याच का? तिला प्रश्न पडला,

तिला हसावं की रडावं कळेना,

शेवटी तिने हसून दिलं आणि कामाला लागली..

सासूबाईंचे मधेच खांदे, पाठदुखी वर येई,

ती अनेकदा डॉक्टरकडे जायला सांगे,

पण त्या म्हणायच्या,


Leave a Comment