खऱ्याची वाट चालूनही, खोटा पुढे निघून जातो, तेव्हा वाटतं, खऱ्याला किंमत नसते, देव त्यालाच दुःखं देऊन जातो..
आपलाच हात धरून माणसं पुढे निघून जातात आपल्याला कळतही नाही आपला फक्त वापर केला गेला हे वळतही नाही..
अंधाराची भीती कुणाला दाखवता, या अंधारातून भयानक काळोख मी बघितलाय
आयुष्यात इतकं सहन केल्यावर सुख बघायचीही भीती वाटते रात्री शांत झोप लागत नाही अन दिवस उजाडायची भीती वाटते
ज्याच्या जीवनात उजेड आणला त्यानेच माझ्या प्रेमाची आहूती दिली ज्याची ओंजळ सुखाने भरली त्यानेच ओंजळ हिरावून नेली
ज्यांच्या दुःखाच्या क्षणी आधाराचा हात पुढे केला त्यांनीच माझ्या अंधाराच्या क्षणी ओळखण्यास नकार दिला
आली गेली अनेक दुःखं सावरत उभा राहिलो पण तू हात सोडलास अन प्रकाशातही चाचपडत गेलो
तुझ्यासाठी मी कुणी नसलो तरी माझ्यासाठी तू सर्वकाही होतीस मी एकटाच स्वप्न बघत गेलो तू मात्र पुढे निघून गेलीस