मैत्री, प्रेम आणि बरंच काही-1

लहानपणापासून मित्र असलेल्या आशुतोषने तिला आपल्या गर्लफ्रेंडचा फोटो पाठवला आणि ती हादरलीच..

“कशी वाटतेय? मी ठरवलं होतं की मी जीची निवड करेन तिचा फोटो मी आधी माझ्या बेस्ट फ्रेंडला दाखवेन”

कक्षणभर तिने काहीच रिप्लाय दिला नाही,

“काय गं कशी वाटतेय?”

त्याने परत मेसेज केला तर तिने “उत्तम” असा रिप्लाय दिला, आणि नंतर बोलते म्हणाली..

तिच्या हातातून फोन गळून पडला,

आशुतोष आणि ती,

अगदी शाळेपासून एकत्र,

त्यांच्या आया अगदी घट्ट मैत्रिणी,

आपल्या मुलांची एकमेकांशी लग्न लावून देऊ हे लहानपणी सुद्धा त्या म्हणायच्या इतक्या घट्ट मैत्रिणी होत्या,

आशुतोष आणि तिला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून तेही एकमेकांना चिडवत, ती सिरीयस होती, पण तो हसण्यावारी नेई…

मुलं अशीच असतात,

मनातलं बाहेर येऊ देत नाहीत,

दोघेही कायम एकत्र असत,

सगळीकडे,

तिला वाटे,

याचं एकही काम माझ्याशिवाय होत नाही,

हे प्रेम नाही तर काय आहे?

दोघेही खूप बोलत, खूप हसत,

भांडण पण खूप करायचे,

एकमेकांची चेष्टा मस्करी करण्याची एकही संधी सोडत नसत,

त्यांना पाहून घरचे म्हणायचे,

****

भाग 2
https://irablogging.in/%e0%a4%ae%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9-3/

भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%ae%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9-2/

भाग 4
https://irablogging.in/%e0%a4%ae%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9/

43 thoughts on “मैत्री, प्रेम आणि बरंच काही-1”

Leave a Comment